Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Konkan › महाड: मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एक ठार, एक गंभीर 

महाड: मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एक ठार, एक गंभीर 

Published On: May 15 2018 12:18PM | Last Updated: May 15 2018 12:18PMमहाड: प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या अपघाताची मालिकेमध्ये सोमवारी रात्री इसाने कांबळे गावचे हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

या संदर्भात महाड औद्योगीक पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूरहून रात्री साडे आठचा सुमारास नझीफ फलनायक  (रा. माप्रळ, जि. रत्नागिरी) हा आपला सहकारी नातेवाईक आमिर कोंडुरकर (रा. कुसगाव ता. महाड) यांच्यासह मोटारसायकल (क्र. एमएच ०८ यू ४५०४) ने पोलादपुरहुन कुसगावकडे येत होते.यावेळी इसाने कांबळे गावाच्या हद्दीमध्ये अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये आमिर कोंडीवकर हा जागीच मृत झाला  तर मोटारसायकल चालक नझीफ फलनायक हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात जखमीला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यांमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे .