Thu, Jun 27, 2019 13:43होमपेज › Konkan › कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा विचार : ना. तावडे

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा विचार : ना. तावडे

Published On: Mar 15 2018 10:52PM | Last Updated: Mar 15 2018 10:52PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालये व विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येणारा प्रशासकीय ताण व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय विचारात घेता मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी होत आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी हिताचा विचार करता याबाबत विचार करून निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक जूनपूर्वी घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

प्रशासकीय दृष्टीने मुबंई विद्यपीठ हे कोकणातील विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महाविद्यालयांसाठी गैरसोयीचे आहे. या ठिकाणी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व प्राध्यापकांच्या सोयीच्या दृष्टीने तसेच स्थानिक गरजेप्रमाणे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करता यावा, यासाठी कोकणात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी  केली. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन वेगळ्या विद्यापीठाचा विचार करणे गरजेचे असल्याची सूचना केली.