Sun, May 26, 2019 12:40होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग येथे जांभेकर, पराडकर यांच्या स्मारकास तत्त्वत: मान्यता 

सिंधुदुर्ग येथे जांभेकर, पराडकर यांच्या स्मारकास तत्त्वत: मान्यता 

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 10:24PMमुंबई (प्रतिनिधी) :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक तसेच हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबुराव पराडकर यांचे स्मारक उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या 4.55 कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.