होमपेज › Konkan › मदुराई एक्स्प्रेस : मोटरमनला घेण्यासाठी खंडाळा घाटात रेल्वे थांबल्याने अपघात

मदुराई एक्स्प्रेस : मोटरमनसाठी रेल्वे थांबवणे पडले महागात

Published On: Jul 07 2018 10:51AM | Last Updated: Jul 07 2018 10:51AMठाणे : अमोल कदम

मध्य रेल्वे मार्गावरून शुक्रवारी पहाटे कुर्ला टर्मिनल्सवरून निघालेली मधूराई एक्स्प्रेसला खंडाळा येथील घाटात अपघात झाला, परंतु हा अपघात मधुराई एक्स्प्रेसच्या पुढील इंजिनच्या डब्यातील मोटरमनने खंडाळा घाटात एका मोटरमनला घेण्यासाठी एक्स्प्रेस थांबवली असल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मदुराई एक्स्प्रेस गाडी खंडाळा रेल्वे स्थानक येथे पोहचत असताना, एक्स्प्रेसला शुक्रवारी पहाटे २ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास एक्प्रेसच्या शेवटचा डब्याला बंकर इंजिनने जोरात धक्का दिल्याने डबा रुळावरून घसरला आणि डब्याचे नुकसान झाले असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. पण खंडाळा घाटात मोटरमनला घेण्याकरिता दोन मिनिट एक्स्प्रेस थांबविली असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये अशी चर्चा सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रवासी देत होते.

पहाटे खंडाळा दिशेकडे मधुराई एक्स्प्रेस जात असताना, पुढील मोटरमनला कॉल आला की एका मोटरमनला घेण्यासाठी दोन मिनिटे एक्स्प्रेस खंडाळा चढणीवर थांबवा, त्याप्रमाणे पुढील मोटरमनने शेवटच्या बंकर इंजिनमधील मोटरमनला न सांगताच एक्स्प्रेस थांबवली आणि त्यामुळे मागील बंकर इंजिन बोगीमध्ये शिरले. त्यामुळे ही घटना घडली असल्याचे काही रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न सांगता माहिती दिली आहे. मधुराई एक्स्प्रेसमधील हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या मोटरमनच्या विरोधात रेल्वे प्रशासन काय कारवाई करते ते आता नक्कीच समोर येणार आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु या घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.