होमपेज › Konkan › कुडाळमध्ये मुलानेच केला आईचा खून

कुडाळमध्ये मुलानेच केला आईचा खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

जेवण वाढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून  आकेरी गावडेवाडी येथील अनंत चंद्रकांत चव्हाण (वय ३०) या तरुणाने स्‍वत:च्या आईचा लाकडी दाडक्याने मारून खून केला. यामध्ये मनिषा चंद्रकांत चव्हाण (वय ६०) यांचा यामध्ये मृत्‍यू झाला आहे. 

यावेळी या महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरल्याचेही स्‍पष्ट झाले आहे. ही घटना मृत महिलेच्या राहत्या घरातच शुक्रवार दि. ३० मार्च रोजी दुपारी घडली. या घटनेनंतर शेजारी राहणार्‍या मनिषा यांच्या भावाने घटनास्‍थळी धाव घेतली मात्र त्‍यावेळी मनिषा मृत झाल्या होत्या. याप्रकरणी संशयित अनंत गवस याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

अनंत चव्हाण हा गेले काही दिवस मानसिक रुग्णाप्रमाणे वागत होता. सावंतवाडीतील एका सलूनमध्ये तो कामाला जात होता. गेले काही दिवस तो कामावर गेला नाही. शुक्रवारी जेवण वाढण्यावरून त्याचे व आईचे शाब्दीक वाद झाले. या वादानंतर त्याने लाकडी दांडक्‍याने आईच्या डोक्‍यात वार केले. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. अनंतने मनिषा यांच्या तोंडावरही केल्या असल्याचे खूना सापडल्या आहेत. यावेळी मृत  मनिषा यांचा भाऊ बाबली चव्हाण समोर राहतात. मनिषा यांचा जोरात आवाज आल्याने त्यांनी घटनास्‍थळी धाव घेतली, तेव्‍हा मनिषा यांचा मृत्यू झाला होता. यानंतर बाबली चव्‍हाण यांनी या घटनेची माहिती पोलिस पाटलांनी देण्यात आली. यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.  कुडाळ पोलिस निरीक्षक अविनाश भोसले आपल्या पथकासह  घटनास्थळी दाखल झाले. याचवेळी पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस सावंतवाडीहून हजर झाले. 

स्‍वत:च्या मुलाने आईचा खून केल्यामुळे परिसरात हळहळ व्‍यक्‍त होत आहे. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस, पोलिस उपनिरीक्षक खरात, महिला पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी घटेचा पंचनामा केला.


  •