Tue, Apr 23, 2019 23:57होमपेज › Konkan › कणकवलीत साई भक्त जागृतीसाठी मोटारसायकल रॅली 

कणकवलीत साई भक्त जागृतीसाठी मोटारसायकल रॅली 

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:19PMकणकवली ः शहर वार्ताहर 

वागदे येथे 2 फेबु्रवारीपासून ‘सबका मालिक एक है’ हे महानाटय होत आहे. या महानाट्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून या पार्श्‍वभूमीवर साई भक्तांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती तसेच वातावरण निर्मितीसाठी शहरातून भव्य गाडीला भगवे झेंडे लावून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली कणकवली साई कार्यालय ते बाजारपेठमार्गे पटकीदेवी येथून तेलीआळी मार्गे वागदे महानाट्याच्या ठिकाणापर्यंत काढण्यात आली. सुमारे 200 हून अधिक मोटारसायकल स्वार या रॅलीत सहभागी झाले होते. 
‘सबका मालिक एक है’ हे या महानाट्याची उत्कंठा साई भक्तांबरोबरच जिल्हावासीयांना लागून राहिली आहे. या नाट्यामुळे कणकवली- वागदे मध्ये प्रतिसाई शिर्डीच अवतरणार आहे. साईबाबांचे जीवनचरित्र प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक झाले आहेत. या रॅलीला लाभलेला युवक व युवतींच्या उत्स्फूर्त प्रतिसादातूनच दिसून येत आहे. या रॅलीमध्ये युवकांसोबतच युवती तसेच  महिलांनीही सहभाग घेतला होता.  मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी, दिवाकर मुरकर, समृद्धी पारकर, शीतल पारकर, नीलम पालव आदी कणकवली व वागदे ग्रामस्थ उपस्थित होते.