Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Konkan › विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण

विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:26PM

बुकमार्क करा

कणकवली : शहर वार्ताहर 

कणकवली शहरालगतच्या एका गावातील विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत मिलींद तांबे (22, रा.असलदे) याने संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार रविवारी पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ज्ञाना, अक्षय दीपक गावडे, संदीप सावंत, अक्षयची आई यांसमवेत अन्य 20 ते 25 जणांवर मारहाण व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. युवतीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची तक्रार शनिवारी दाखल झाल्याने पोलिसांनी प्रशांत तांबे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. रविवारी त्याची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर प्रशांत तांबे याने सायंकाळी कणकवली पोलिसांत युवतीच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दिली. 

या तक्रारीत त्याने म्हटले आहे, युवतीचे व आपले प्रेमसंबंध होते. युवतीने याबाबत घरच्यांना सांगितले असता आपण बौध्द समाजाचा असल्याचे घरच्यांनी प्रेमसंबंधास विरोध केला. त्यावर युवतीने आपण पळून जाऊन लग्न करू ,असे सांगितले असता आपण पळून न जाता तुझ्या आई, वडिलांशी घरी येऊन  चर्चा करतो असे सांगितले. त्यानंतर शनिवारी सकाळी 11 वा. मी तिच्या घराशेजारी थांबून तिला फोन केला तेव्हा ती कणकवलीत होती. तिने मी थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहचते,  असे सांगितले व 11.30 च्या सुमारास तेथे ती पोहचली. तेथे आम्ही बोलत असताना ज्ञाना नावाच्या इसमाने हातातील लाकडी दांड्याने आपणास मारहाण करण्यास सुरू केली. तेथेच लपून असलेल्या अक्षय गावडे व संदीप सावंत यांनी व अन्य 20 ते 25 जणांनी आपणास मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केली.