Sat, Feb 16, 2019 21:04होमपेज › Konkan ›  आ. नितेश राणेंचे ग्रामविकासमंत्र्यांना साकडे

 आ. नितेश राणेंचे ग्रामविकासमंत्र्यांना साकडे

Published On: Dec 14 2017 1:45AM | Last Updated: Dec 13 2017 10:32PM

बुकमार्क करा

वैभववाडी : वार्ताहर

संगणकीय युगात स्वातंत्र्यपूर्व काळातील जीवन जगत असणार्‍या   करुळ-केगदवाडी येथील पिढ्यान् पिढ्यांचा असणारा अंधार दूर करावा, या वाडीसाठी मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात, या वाडीला पिण्याच्या पाण्यासह रस्ता, वीज आदी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध  कराव्यात, अशा आशयाचे निवेदन आ. नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांना दिले.

देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षाचा कालखंड उलटून गेला. परंतु सिंधुदुर्गातील काही गाव, वाडी-वस्त्यांवर आजही मूलभूत सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. वैभववाडी तालुक्यातील करुळ- केगदवाडी ही आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.   ग्रामस्थांना वीज नसल्याने अंधारात चाचपडावे लागत आहेच. शिवाय पाणी, रस्ते या सोयी सुविधा  पोहचलेल्या नाहीत.  या वाडीतील ग्रामस्थांनी वारंवार पत्रव्यवहार करुनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. करुळ-धनगरवाडीकडे जाणारा सुमारे 3 कि.मी.लांबीच्या अंतराच्या रस्त्याच्या मजबूतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करणे, सदर रस्त्यावरील नदीवर तीन लहान पूल बांधणे व धनगरवाडीस पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय करणे आदी कामे विनाविलंब हाती घेवून पूर्ण करावीत, अशा आशयाचे निवेदन आ.नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे.