Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Konkan › मृत मितेश जगताप यांच्या वडिलांवर  प्राणघातक हल्ला

मृत मितेश जगताप यांच्या वडिलांवर  प्राणघातक हल्ला

Published On: May 02 2018 11:55PM | Last Updated: May 02 2018 11:55PMटिटवाळा :  मृत मितेश जगताप यांच्या वडिलांवर  प्राण घातक हल्ला, तिन वेळा आले होते जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र मितेश जगताप या  तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन २३ ऑगस्ट २०१७ रोजी  आत्महत्या केली होती.

पोलिसांना मितेश केवळ रात्री पेट्रोलिंग करत असताना विना नंबर गाडीसहित तो भेटला म्हणून एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखी त्याला वागणूक दिली आणि म्हणूनच आपल्या मुलाने पोलिस जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप  पोलिसांवर होता. याविरोधात जगताप कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेत संबंधित आरोप असलेल्या पोलिसांवर गुन्हा नोंदवाला मात्र हे केल्यानंतर एका मागोमाग एक  "पोलिसांविरोधातली केस मागे घ्या नाहीतर जिव गमावुन बसाल, तुम्हाला तुमच्या मुलाकडे पाठवण्याची व्यवस्था करु असे असे तीनवेळा धमकीचे   आले  होते.  मात्र आज संध्याकाळी कोलड्रिंकमधुन त्यांना गुंगीचे औषध पाजून मृत मितेश जगताप यांचे वडील राजेश जगताप  यांच्यावर हा हल्ला करण्यात आली असल्याची माहिती मृत मितेश जगताप याची आई  पुष्पा जगताप  यांनी दिली.

सध्या राजेश जगताप यांच्यावर टिटवाळया नजीक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. आता झालेल्या  हल्ल्यामुळे आता हे प्रकरण आता अधिकच गंभीर  दिसुन येत आहे.