Fri, Jul 19, 2019 22:02होमपेज › Konkan › मिरजोळेत नमन स्पर्धेतून लोककलेचा जागर

मिरजोळेत नमन स्पर्धेतून लोककलेचा जागर

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 30 2018 11:51PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरानजीकच्या मिरजोळे येथील माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नमन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेने कोकणातील कलाकारांना व्यासपीठ मिळाले असून लोककलेचा जागर याठिकाणी पहायला मिळाला.

या स्पर्धेत लांजा तालुक्यातील श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळ कुवे-मावळतवाडी मंडळाने प्रथम क्रमांक तर रत्नागिरी तालुक्यातील विठ्ठल-रखुमाई खापरे-धनावडे नमन मंडळ, करबुडे खापरेवाडीने द्वितीय क्रमांक तर गणेश कला नाट्यमंडळ कळझोंडी-वीरवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

माघी गणेशोत्सवानिमित्त पाडावेवाडी येथे निमंत्रित मंडळांची ही नमन स्पर्धा घेण्यात आली होती. याचा प्रारंभ जि. प. सदस्य महेश म्हाप, सरपंच गजानन गुरव, शिवसेना युवानेते वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता. या स्पर्धेत रत्नागिरी, संगमेश्‍वर, लांजा या तालुक्यांतील विविध नमन मंडळांनी सहभागी होऊन आपली कला सादर केली. 

विजेत्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह सरपंच गजानन गुरव, उपसरपंच गणेश पाडावे, ग्रा.पं.सदस्या पूनम पाडावे, उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक गावकर, उपाध्यक्ष प्रकाश पाडावे, माजी उपसरपंच सुभाष पाडावे, माजी ग्रा.पं.सदस्य भिकाजी पाडावे, अर्जून पाडावे तसेच सुनील कोलगे, नागेश पाडावे, दिलीप पाडावे, धनावडे, सांबरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. 

 वैयक्तिक कला व अभिनय सादर करणार्‍या कलाकारांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उत्कृष्ट नारद-संदेश बांडागळे (सोंबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ, मोर्डे संगमेश्‍वर), उत्कृष्ट कृष्ण-दुर्वांक पालकर (श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळ, कुवे-मावळतवाडी), विनोदी कलाकार (मावशी) - रवींद्र वीर (गणेश कला नाट्यमंडळ कळझोंडी, वीरवाडी). उत्कृष्ट गौळण - गणेश कला नाट्यमंडळ कळझोंडीच्या पायल, ऋतिका, प्रतीक्षा, संचनी, वैतिक्षा या कलाकारांना सन्मानित करण्यात आले. लक्षवेधी अभिनय (सिंधुसूर) -ओंकार खापरे (विठ्ठल-रखुमाई खापरे-धनावडे नमन मंडळ, करबुडे), उत्कृष्ट मृदुंग वादन-विजय गोताड व विघ्नेश गोताड (श्री गणेश नवतरूण मंडळ, गोताडवाडी करबुडे) यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट दिग्दर्शन-चंद्रकांत पालकर (श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळ, कुवे मावळतवाडी), उत्कृष्ट रंगमंच सजावट-श्री नवलाई मंडळ नमन कलापथक टिके भातडेवाडी यांनी पटकावले. रंगभूषा-विठ्ठल रखुमाई खापरे-धनावडे नमन मंडळ, करबुडे, उत्कृष्ट पार्श्‍वगायन- देवेंद्र झिमण (श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळ कुवे-मावळतवाडी) यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेला स्थानिक रंगप्रेमींनीही भरभरून दाद दिली व कलाकारांचे कौतुक केले.