Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : खांदाटमध्ये स्कॉर्पिओखाली चिरडून चिमुरडीचा अंत

रत्‍नागिरी : खांदाटमध्ये स्कॉर्पिओखाली चिरडून चिमुरडीचा अंत

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:30PMचिपळूण : खास प्रतिनिधी

तालुक्यातील खांदाट भोईवाडी येथे स्कॉर्पिओ गाडी मागे घेताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुरडीचा बळी गेला आहे. अवघी तीन वर्षांची सुमय्या राजू मुल्ला (रा. खांदाट, भोईवाडी) या चिमुकलीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. याबाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची खबर राजू अण्णासाहेब मुल्ला यांनी खेर्डी पोलिसांना दिली. यानुसार, शंकर बबन घाडगे हे आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडी अचानक मागे घेत असताना परिसरात खेळणारी चिमुकली सुमय्या ही अचानक गाडीखाली आली व तिचा त्यामध्ये जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी खेर्डी पोलिस तपास करीत आहेत.