रत्नागिरीत वादळामुळे जीवितहानी नाही

Last Updated: Jun 03 2020 7:07PM
Responsive image
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत


रत्नागिरी : पुढारी ऑनलाईन

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जखमी झाले. मात्र  कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसांत भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वाऱ्याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आली. ही नाव किनाऱ्याला आणली असून यावरील १३ खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे.

हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये १० भारतीय असून ३ परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सामंत म्हणाले. हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने खराब झालेले तेल सांडले, कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बोट महिनाभर आहे त्याच जागी राहील, असे ते म्हणाले.

मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे, असे सामंत यांनी सांगितले.

लोकसंख्येच्या प्रमाणात भारताची रुग्णसंख्या कमी


'या' बहाद्दराचे एकाच मंडपात एकाचवेळी दोघींशी लग्न पण....


सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू