Sun, Nov 18, 2018 14:13होमपेज › Konkan › राजापुरात मिनीबस दरीत कोसळून चालक ठार

राजापुरात मिनीबस दरीत कोसळून चालक ठार

Published On: Dec 30 2017 12:47AM | Last Updated: Dec 29 2017 10:47PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक मिनी बस दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृताची ओळख अद्याप ओळख पटलेली नाही.

अपघातग्रस्त मिनीबस गोव्याहून मुंबईकडे चालली होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावरील भंडारवाडी तळीजवळ एका  वळणावर आली असता चालकाला अंदाज न आल्याने ती रस्त्याच्या बाजूच्या मोठ्या दरीत कोसळली.  या बसमध्ये चालकाव्यतिरिक्‍त कुणीच नव्हते. अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली होती.  बसच्या जखमी चालकाला तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.