Wed, Apr 24, 2019 07:42होमपेज › Konkan › माथाडी कामगारांचा चिपळुणात मोर्चा

माथाडी कामगारांचा चिपळुणात मोर्चा

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 30 2018 11:40PMचिपळूण : खास प्रतिनिधी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण हमाल पंचायततर्फे मंगळवारी (दि. 30) माथाडी कामगारांच्या वतीने चिपळुणात शासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात चिपळुणातील 400 हमाल सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार जीवन देसाई यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाक्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण हमाल पंचायत माथाडी कामगारांनी मोर्चा काढला. या मोर्चात शासनाने माथाडी कायद्याला विरोध दर्शवल्याने माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन करुन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये शासनाच्या विरोधात कामगारांनी घोषणा दिल्या. हम सब एक है, हमाल पंचायतीचा विजय असो, कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहाणार नाय, राज्य शासनाने घेतलेला निर्णय रद्द झाला पाहिजे, हमाल पंचायत एकजुटीचा विजय असो.... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य शासनाच्या कामगार विभागाने राज्यातील 36 माथाडी मंडळाचे विलीनीकरण करुन राज्याचे एकच माथाडी मंडळ स्थापन करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचा शासनाने दि.17 जानेवारी रोजी घेण्यात आला. तो तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी दि.30 रोजी राज्यातील सर्व हमाल माथाडी कामगारांच्या संघटनांनी लाक्षणिक बंदचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील हमाल माथाडी संघटनांनी मोर्चा काढून निषेध नोंदविला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चामध्ये अध्यक्ष अनिल शिंदे, खजिनदार वसंत कांबळी, सहसचिव भैय्या कदम, गौतम जाधव, प्रदीप पवार, गणेश महाडिक, यशवंत दाभोळकर, शंकर माळी, वसंत कांबळी यांच्यासह 400 माथाडी हमाल कामगार सहभागी झाले होते. शासनाने काढण्यात आलेला अध्यादेश फाडून निषेध करण्यात आला.