Tue, Mar 19, 2019 09:30होमपेज › Konkan › लोणंदच्या बोकड बाजारात कोटींची उलाढाल 

लोणंदच्या बोकड बाजारात कोटींची उलाढाल 

Published On: Aug 16 2018 1:09PM | Last Updated: Aug 16 2018 1:09PMलोणंद : प्रतिनिधी 

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बोकड व बकरी बाजारात पुढील आठवड्यात होणाऱ्या बकरी ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती आवारात जत्रा भरल्याचे स्वरूप आले होते. आजच्या बाजारात तीन ते चार कोटी रूपयांची उलाढाल झाली.

आजच्या बाजारात बकरी व बोकडांची सुमारे पंधरा ते वीस हजारापर्यत झाली होती. एका बोकडाची किंमत ५० ते ७५ हजारापर्यत गेली . तर आजच्या बाजारात सुमारे तीन ते चार कोटीची उलाढाल होणार असल्याचे लोणंद बाजार समितीचे राजेंद्र तांबे यांनी दिली.

बाजारात बकरी व बोकड खरेदीसाठी कर्नाटक , गोवा,राज्यासह हुबळी, घारवाड, बेंगलोर  , कोकणातील महाड, सिंधुदुर्ग , रत्नागिरी,सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातील सुमारे पंधरा ते वीस हजारापर्यत खरेदीदार आले होते. तर वाहनांची संख्याही मोठी होती.

बाजारात बकरी व बोकड खरेदी विक्री उलाढालीतून सुमारे दिड लाखाचा  सेस बाजार समितीला जमा होईल असे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी सांगितले.