Tue, Jul 16, 2019 11:42होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : पिंगुळीत टायर पेटवून वाहतूक रोखली (video)

सिंधुदुर्ग : पिंगुळीत टायर पेटवून वाहतूक रोखली (video)

Published On: Jul 24 2018 10:18PM | Last Updated: Jul 24 2018 10:23PMकुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाने आंदोलन तीव्र केले आहे. मंगळवारी रात्री कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन छेडले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सोमवारी रात्री नेरूरपार पुलाजवळही रस्त्यावर टायर पेटवून कुडाळ-मालवण मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती. दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्हा बंदची हाक दिली आहे.