Mon, Sep 24, 2018 15:48



होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : आंदोलकांनी मुंबई- गोवा महामार्ग रोखला 

सिंधुदुर्ग : आंदोलकांनी मुंबई- गोवा महामार्ग रोखला 

Published On: Jul 26 2018 10:48AM | Last Updated: Jul 26 2018 11:00AM



कुडाळ (जि.सिंधुदूर्ग)  : प्रतिनिधी 

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सकल मराठा कांती मोर्चाच्या आदोंलकांनी ठिकठिकाणी महामार्ग, राज्य व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गावर  बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी सकाळी साडे दहापर्यंत टायर पेटवून आणि झाडे तोडून महामार्ग बंद केला. त्‍यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होती. 

आंदोलकांकडून एसटी बसवरही दगडफेक करण्यात आली. कुडाळ शहरातील पेट्रोल पंपही बंद  करण्यास भाग पाडले. दुसरीकडे कुडाळ व्यापारी वर्गाने बंदला पाठींबा दिला आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील बहुतांश शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.