Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Konkan › गृहराज्यमंत्री विचारतात, काय कसं चाललय मजेत आहात ना ?

गृहराज्यमंत्री विचारतात, काय कसं चाललय मजेत आहात ना ?

Published On: Jul 30 2018 3:52PM | Last Updated: Jul 30 2018 3:52PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाधव यांनी सर्वात आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या मागणीसाठी त्यांनी सोमवारी मंत्रालयासमोर महात्मा गांधी पुतळ्याच्या खाली ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

त्यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्री केसरकर यांना लक्ष्य केले. शिवसेनेच्या बैठकीला पोहचल्यानंतर केसरकर यांनी  काय कसं चाललय मजेत आहेत ना ?अशी विचारणा आपल्याला केली असल्याचे जाधव यांनी सांगितले. एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दररोज तरुण आत्महत्या करत आहेत, महाराष्ट्रात आगडोंब उसळला आहे. या स्तिथीत राज्याचा गृहराज्यमंत्री इतक्या सहजतेने कसा वावरू शकतो असा सवालही त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारा मी पहिला आमदार आहे, आणि मलाच मजेत आहेत ना ? अशी विचारणा करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न ही त्यांनी केला.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या देणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढावा. सरकारला वाटत असेल की, हा अध्यादेश न्यायालयात टिकणार नाही पण तोपर्यंत मागास आयोगाचा अहवाल ही सादर होईल असे त्यांनी म्हटले. सरकारने हा अध्यादेश न्यायालयात टिकेल की नाही याचा फारसा विचार न करता आंदोलकांना दिलासा देण्यासाठी अध्यादेश काढावा. तसेच राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आह. याबाबत सरकार कोणतीही भूमिका घेताना दिसत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीचा पर्यंत खुला असल्याचेही जाधव यांनी सांगितले.