Tue, Mar 26, 2019 07:38होमपेज › Konkan › मराठा आंदोलन : मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन 

मराठा आंदोलन : मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन 

Published On: Jul 26 2018 6:32PM | Last Updated: Jul 26 2018 6:32PMसिंधुदुर्ग : सचिन राणे           

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या सिंधुदुर्ग बंदला जिल्‍ह्यातील परिसरातील मराठा समाजातील व इतर नागरिक सहभागी होत उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मराठा बांधवांनी  एकत्रित मोर्चा काढत मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन करत महामार्ग रोखून धरला.
       
विभागातील मराठा बांधव व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन शासनाच्या विरोधात विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.  मोर्चा काढत महामार्ग रोखून धरला.

व्यापारी, रिक्षा, टेम्पो, ट्रक व इतर संघटनांनी मराठा आंदोलनाला पाठींबा दर्शवत बंदमध्ये सहभागी झाले. तसेच ठिक ठिकाणी रस्त्यावर झाडे, टायर पेटवूनही महामार्ग व राज्य मार्ग बंद केले. आजच्या मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या सिंधुदुर्ग बंदला सर्वच समाजातील नागरिकांबरोबर  मुस्लीम बांधवांनीही समर्थन दिले. या भागातील सर्वच गावा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.