Thu, Apr 25, 2019 14:08होमपेज › Konkan › अन्यथा आंबा नुकसान भरपाई परत जाणार

अन्यथा आंबा नुकसान भरपाई परत जाणार

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 10:20PMसंगमेश्‍वर : प्रतिनिधी

संगमेश्‍वर तालुक्यातील आंबा व काजू बागायतदारांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानाची भरपाई शेतकर्‍यांना देण्यात आली आहे. मात्र, काही शेतकर्‍यांचे धनादेश न वटणे, लाभार्थी बाहेरगावी असणे अशा विविध कारणांमुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा झालेली नाही, अशा लाभार्थींनी 25 जानेवारीपर्यंत तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार संदीप कदम यांनी केले आहे. संपर्क न साधल्यास ही रक्‍कम शासनाकडे वर्ग होईल, असेही त्यांनी सूचित केले आहे.

एप्रिल मे महिन्यात आंबा, काजूचे फळ परिपक्‍व होते. सन 2014-15 मध्ये या कालावधीत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. या नुकसानाचा पंचनामा शासनाच्या वतीने करण्यात आला. यानुसार संगमेश्‍वर तहसील कार्यालयाकडे पहिल्या टप्यात 13 कोटी 85 लाख 22 हजार 500 रूपये तर दुसर्‍या टप्प्यात 3 कोटी, 85 लाख 22 हजार 500 रूपये इतके अनुदान प्राप्त झाले. कार्यालयात प्राप्त असणार्‍या मूळ शेतकरी यादी व पुरवणी यादीतील लाभार्थ्यांना हमीपत्राच्या आधारे बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. दरम्यान, आंबा, काजू नुकसान भरपाईसाठी वाटप केलेले अनुदान लााार्थी बाहेरगावी असणे, धनादेश जमा न करणे यामुळे अनुदान सदर लाभार्थींच्या बँक खात्यात जमा न होता तहसीलदार संगमेश्‍वर या शासकीय खात्यात जमा आहे. 

शासनाकडील व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन 2016-17 या वर्षाचे वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र 29 जानेवारीपर्यंत सादर करावयाचे आहे. यामुळे ज्या बाधित शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसानाची रक्‍कम जमा झालेली नाही, अशा शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. हा  रक्‍कम  शासनाकडे जमा झाल्यास त्याला तहसील कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे तहसीलदार कदम यांनी स्पष्ट केले आहे.