Sat, Feb 16, 2019 09:16होमपेज › Konkan › मांगेली ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

मांगेली ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 1:52AMदोडामार्ग : वार्ताहर 

मांगेली - तळेवाडी ते फणसवाडी हा 3 कि. मी. लांबीचा रस्ता खराब झाला आहे. गेल्या वर्षी येथील ग्रामस्थ उपोषणास बसले असताना त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रस्त्याची रुंदी व एक लेअर डांबरीकरण करून देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्याप या रस्त्याची पूर्तता झाली नाही. 

तसेच येथील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला 15 एप्रिलपर्यंत  रस्ता दुरुस्त करण्याचे लेखी निवेदन दिले होते. बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने झाल्याने फणसवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास  सुरुवात केली. 

मांगेलीवासीय सोयी-सुविधांपासून आजही वंचित आहेत. मांगेली तळेवाडी ते फणसवाडी  3 कि. मी. लांबीचा रस्ता खराब झाला. या रस्त्याला जिल्हा नियोजन व पर्यटन विकासमधून 80 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, दोन वर्षेसुद्धा हा रस्ता व्यवस्थित राहिला नाही. खराब झालेल्या  रस्त्यासाठी गेल्या वर्षी फणसवाडी  ग्रामस्थांनी  उपोषण केले होते. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रस्त्याची रुंदी व एक लेअर डांबरीकरण करून देण्याचे लेखी आश्‍वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र, या आश्‍वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही. यामुळे फणसवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारपासून दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत कोणीही उपोषणस्थळी भेट दिली नव्हती.