Thu, May 23, 2019 20:32
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › कुंबळे येथे ट्रकची धडक बसून वृद्ध ठार

कुंबळे येथे ट्रकची धडक बसून वृद्ध ठार

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 10:17PMमंडणगड : प्रतिनिधी

तालुक्यातील कुंबळे बाजारपेठेतून किटा घेऊन निघालेल्या ट्रकची धडक बसून वृद्ध ठार झाल्याची घटना शनिवारी  रात्री आठच्या सुमारास घडली आहे. बशीर इल्लस चिखलकर (वय 59) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

यासंदर्भात बशीर बालमियाँ चिखलकर (60, रा. तिडे) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी (दि. 12) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बशीर इल्लस चिखलकर हे कुंबळे येथील आपल्या घरातून बसथांब्याकडे येत होते. यावेळी लाटवणहून निघालेल्या भरधाव ट्रकने कुंबळे बाजारपेठेतून जाताना या चिखलकर यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर बशीर चिखलकर यांना मंडगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषीत केले. दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी संदीप शांताराम भोजने (41, रा. म्हाप्रळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.