Fri, Apr 26, 2019 04:10होमपेज › Konkan › आसावलेतील खेळ्यांचा अनवाणी प्रवास 

आसावलेतील खेळ्यांचा अनवाणी प्रवास 

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 11:08PMमंडणगड : प्रतिनिधी

दुसर्‍या होळीला श्री कालकाई देवीला गार्‍हाणे घालून देवीची मान्यता प्राप्त केल्यानंतर देवीची पालखी देवीचा साज चढवलेल्या पोर्‍यासोबत गावभेटीला निघाली. वैशिष्ट्य म्हणजे आजही पालखीचे खेळी शेकडो किलोमीटरच्या प्रवासात गावभेटी दरम्यान अनवाणी पायीच प्रवास करतात. मुंबईकर तरुणांचा भरणा असतानाही वेगळ्या कडक शिस्तीमुळे आसावले गावाचा नावलौकिक झाला आहे. 

रात्रीच्या वेळी विजेरीच्या प्रकाशात काढण्यात येणारी मानाची शेरणे पाहणे अद्भूत असते. आठ दिवसांच्या प्रवासात रातांबेवाडी, घोसाळे, पणदेरी पाटीलवाडी, गुजरवाडी, भट्टीवाडी, पेवे येथील सर्व वाड्या घेऊन उंबरशेतला वस्ती केल्यानंतर पालखीचा प्रवास सुरु झाला. उंबरशेत कोळीवाडा येथून सावित्री खाडी होडीतून पार करून रायगड जिल्ह्यात गरदाव येथे प्रवेशून संदेरी, बेलाची व मटाची नवीवाडी, आंबेत गाव घेऊन कोकरे येथे तिसरी वस्ती, पुढे रिंगकोड, दाभोळ पाटीलवाडी, दाभोळ खळाटी, सापे, टोळच्या दोन वाड्या घेऊन भांडीवलीला मानाचं जेवण घेण्यात आले.  केस्तुलीलाही खेळ्यांना गोड जेवण घालण्यात आले. फळांनी, कृष्ण नगरी, कासर मलई सोनघर, खामगाव, गौळवाडी, कणघर, मोरवणे, पाष्टी गौळवाडी, पासष्टी, मादाटने, कुडगाव, निवातेकोंड, खारगाव, आमशेत केळ्यांतर पंदेरी पकटीवर येऊन कोंडगाव येथे उतरून दंडनगरी मार्गे बहिरीवाडी, सुतारवाडी, बहिरीवाडी, आंबवणे (बुद्रुक), शिगवण कोंड, शिगवण, आंबडवे, सावरी, निगडी, घुमरी अशी गावे घेत पालखीचे आसावले गावात आगमन झाले आहे. 

दि.1 मार्च रोजी होम पेटवल्यांतर गावातून घरोघरी पालखी फिरवण्यात येणार असून मानाची शरण रात्रीची काढण्यात येणार आहेत. रात्रभर देवीला खांद्यावर अगदी थकेपर्यंत नाचवल्यांतर पुन्हा एकदा मनोरंजनाचा कलात्मक तमाशा रंगणार आहे. त्यानंतर पहाटे मंदिरात स्थानापन्न होईल. दि.2 मार्च धुलिवंदनला देवीला केलेले नवस फेडले जाणार आहेत.