Fri, Apr 19, 2019 12:41होमपेज › Konkan › अपघातात खेडमधील व्यापारी ठार

अपघातात खेडमधील व्यापारी ठार

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 10:22PMखेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून,  रायगडमध्ये नागोठण्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर तसेच कंटेनरमध्ये झालेल्या  भीषण अपघातात खेड येथील प्रवासी वाहतूक व्यावसायिक जगदीश  खेडेकर यांचा मृत्यू झाला. यामुळे खेडवर शोककळा पसरली आहे. हा अपघात मंगळवारी (दि. 23) सकाळी झाला.

येथील प्रवासी वाहतूक व्यावसायिक जगदीश खेडेकर आपला टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन मुंबईहून खेडला येत होते, तर कंटेनर मुंबईकडे जात असताना नागोठणे येथे या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.