Wed, Sep 19, 2018 18:11होमपेज › Konkan › आकेरी येथे दुचाकी घसरून युवक जागीच ठार

आकेरी येथे दुचाकी घसरून युवक जागीच ठार

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:08AM

बुकमार्क करा
कुडाळ : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर आकेरीतिठा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात विठ्ठल विजय कांदे (35, रा. हुमरस कांदे तावडेवाडी)  हा युवक ठार झाला. हा अपघात 5 वा. च्या सुमारास घडला. विठ्ठल कांदे हा आकेरी येथून हुमरस येथील घरी जात होता.

त्याच्या ताब्यातील एम.ए.टी. ही दुचाकी आकेरीतिठा दरम्यान रस्त्याच्या बाहेर गेली. गाडी परत रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो दुचाकीसह रस्त्यावर पडला.