Thu, Jul 18, 2019 02:08होमपेज › Konkan › मालवण पालिका सभापतींची अपेक्षित निवड

मालवण पालिका सभापतींची अपेक्षित निवड

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 11:34PM

बुकमार्क करा
मालवण :  प्रतिनिधी

मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड अपेक्षेप्रमाणे झाली. यात आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतीपदी परशुराम ऊर्फ आप्पा लुडबे, बांधकाम नियोजन विकास समिती सभापतीपदी सौ. सेजल परब, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. तृप्ती मयेकर तर उपसभापतीपदी सौ. पूजा सरकारे यांची निवड प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी जाहीर केली.

विषय समिती निवडीसंदर्भात शनिवारी पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, आप्पा लुडबे, गणेश कुशे, मंदार केणी, दीपक पाटकर, यतीन खोत, पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, पूजा सरकारे, पूजा करलकर, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर आदी उपस्थित होते. 

आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक सभापतीपदासाठी परशुराम लुडबे, बांधकाम नियोजन विकास समिती सभापतीपदासाठी सेजल परब, महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी तृप्ती मयेकर, उपसभापतीपदासाठी पूजा सरकारे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. त्यामुळे या सर्वांची बिनविरोध निवड डॉ. सूर्यवंशी यांनी जाहीर केली. यात स्थायी समिती अध्यक्ष नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपाध्यक्ष राजन वराडकर हे काम पाहतील असे स्पष्ट करण्यात आले. बांधकाम विकास समितीत सदस्य म्हणून गणेश कुशे, मंदार केणी, पाणीपुरवठा जलनिस्सारण समितीत राजन वराडकर, पंकज सादये, दर्शना कासवकर, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समितीत आकांक्षा शिरपुटे, ममता वराडकर, महिला व बालकल्याण समिती शीला गिरकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.