Sat, Jul 20, 2019 15:04होमपेज › Konkan › तारकर्लीतील दोन कुटुंबांत हाणामारी

तारकर्लीतील दोन कुटुंबांत हाणामारी

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:27PM

बुकमार्क करा
मालवण : प्रतिनिधी 

तारकर्ली बंदर येथील रहिवासी राधाकृष्ण गणपत परब व बाळकृष्ण शिवराम कोळंबकर या दोन कुटुंबीयांमध्ये जागेच्या वादातून जोरदार मारामारी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यामध्ये दोन्ही कुटुंबामधील पुरुष, महिला जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत बुधवारी रात्री उशिरा दोन्ही कुटुंबीयांनी मालवण पोलिस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. एकूण 13 जणांवर गैरकायदा जमाव, शिवीगाळ, व मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राधाकृष्ण गणपत परब (वय 45, रा. तारकर्ली बंदर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी राधाकृष्ण परब यांच्या जागेचे कोर्ट कमिशन होणार असल्याने सायंकाळी  पाहणीसाठी वकील आले होते. राधाकृष्ण परब व त्यांचे सर्व कुटुंबीय जागेवर हजर होते. त्यावेळी बाळकृष्ण शिवराम कोळंबकर व त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांनी त्या ठिकाणी येऊन जागेत लावलेले दगड, झावळे बाजूला केले. तसेच कंपाऊंडचे दगडही बाजूला करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परब हे जाब विचारण्यास गेले असता सातही जण अंगावर धावून आले. त्यातील गोपीचंद कोळंबकर याने परब यांच्या शर्टला पकडून तोंडावर ठोशा मारला. यामुळे त्यांना  दुखापत झाली. तसेच नशेत असणार्‍या बाळकृष्ण कोळंबकर यानेही बिअरची बॉटल आपल्या डोक्यावर पाठीमागून मारली.