Thu, Aug 22, 2019 03:51होमपेज › Konkan › ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड केल्यास मिळणार ‘सुवर्ण बक्षीस’!

‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड केल्यास मिळणार ‘सुवर्ण बक्षीस’!

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 9:32PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

देशपातळीवर घेण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या स्पर्धेसाठी मालवण नगरपरिषदेने जोरदार तयारी सुरु केली आहे. स्पर्धेतील महत्त्वाच्या निकषानुसार शासनाचे ‘स्वच्छता अ‍ॅप’ मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे गरजेचे असणार आहे. मालवण शहरातील प्रत्येक नागरिकाने मोबाईल मध्ये स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करावे, यासाठी पालिकेच्या वतीने सोन्याच्या नाण्यासह विविध बक्षिसांची खैरात असणारी स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी दिली.

मालवण पालिका उपनगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेवक पंकज सादये, स्पर्धा प्रायोजक सुवर्णकार चंद्रवदन कुडाळकर उपस्थित होते.  श्री. लुडबे म्हणाले, मालवण शहरातील अनेक नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. मात्र, अधिकाधिक नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी पालिकेने विशेष स्पर्धा जाहीर केली आहे. त्यानुसार अ‍ॅप डाऊनलोड करुन कचर्‍याबाबत अधिकाधिक तक्रारी नोंदवणार्‍यांसाठी लकी ड्रॉ सोडत घेतली जाणार आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधी व कर्मचारी हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात. मात्र, त्याना लकी ड्रॉ स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.