Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Konkan › मालवणात ‘सी वॉटर पार्क’चा शुभारंभ

मालवणात ‘सी वॉटर पार्क’चा शुभारंभ

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:19PM

बुकमार्क करा

मालवण ः प्रतिनिधी

मालवण दांडी बीच समुद्रात साकारलेल्या व महाराष्ट्र किनारपट्टीवरील पहिल्या ‘सी वॉटर पार्क’चे उद्घाटन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खा. नीलेश राणे यांच्या हस्ते  करण्यात  आले.  केवळ विदेशात पाहावयास मिळणारे सी वॉटर पार्क मालवण किनारपट्टीवर स्वतःच्या हिंमतीवर साकारणार्‍या स्थानिक तरुणांचे धाडस कौतुकास्पद आहे. दांडी सी वॉटर पार्क जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्रातील नवे डेस्टीनेशन ठरेल,  तरुणांनी असे नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्माण करावेत, त्यास ‘स्वाभिमान’चे नेहमीच सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन नीलेश राणे यांनी शुभारंभ प्रसंगी केले. 

सी वॉटर पार्कचे प्रणेते दामू तोडणकर, रुपेश प्रभू यासह स्वाभिमानचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार केणी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, बाबा परब, नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेविका पूजा करलकर, सुनीता जाधव, ममता वराडकर, आकांशा शिरपुटे, किल्ला होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, मच्छीमार व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेश लोणे, परशुराम पाटकर, भाई मांजरेकर, अभय कदम, गौरव प्रभू, भाजपचे भाऊ सामंत, भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, आदी व इतर जलपर्यटन व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते. शुभारंभानंतर पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी हे पार्क खुले करण्यात आले आहे. 

 पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उभारण्यात आलेले हे वॉटर पार्क  पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरेल. असा विश्‍वास राणे यांनी व्यक्त केला.स्थानिकांनी स्वतःच्या हिमतीवर समुद्रकिनारी जलपर्यटन व्यवसाय फुलविला आहे. स्कुबा डायविंग, वॉटरस्पोर्ट आदी व अन्य जलक्रीडा प्रकारांना मान्यता दिली जात नाही. मात्र पर्यटन व्यावसायिकांनी व्यवसाय उभारला की बंदर खाते नोटीस काढते. त्यामुळे मागून मिळत नसेल तर खेचून घ्यावे लागेल असे सांगत दामू तोडणकर यांनी जलपर्यटन व्यवसायातील त्रुटी  दूर करण्याची मागणी केली.