Fri, Feb 22, 2019 09:29होमपेज › Konkan › समुद्र झाला शांत ; बावटाही हटविला

समुद्र झाला शांत ; बावटाही हटविला

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:02PM

बुकमार्क करा

मालवण : वार्ताहर 

ओखी चक्रीवादळसदृश परिस्थिती बुधवारी पूर्णतः निवळली असून खवळलेला समुद्रही शांत झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बंदर विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या तीन नंबरचा बावटाही बुधवारी हटविण्यात आल्याची माहिती बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी दिली.  दरम्यान समुद्रातील वातावरण निवळल्याने काही मच्छीमार समुद्रात मासेमारीस गेल्याचे दिसून आले. त्यांना बांगडी, तारली मासळी मिळाली. गुरुवार  पासून समुद्रावर पुन्हा नव्या जोमाने स्वार होण्यास मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे. गेले तीन दिवस ओखी चक्रीवादळामुळे  मच्छीमारांची झोप उडाली होती.सहाजिकच मासेमारीही ठप्प  झाली होती.