Tue, Mar 19, 2019 09:18होमपेज › Konkan › मालवण बाजारपेठेतील चार अतिक्रमणे पालिकेने हटविली

मालवण बाजारपेठेतील चार अतिक्रमणे पालिकेने हटविली

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 9:58PMमालवण : प्रतिनिधी

मालवण बाजारपेठ रस्ता रुंदीकरणासाठी सोडण्यात आलेल्या जागेत संबंधित व्यापारी व जागा मालकांनी केलेल्या अतिक्रमणांवर इशारा दिल्याप्रमाणे बुधवारी नगरपालिकेने हातोडा फिरवत ही अतिक्रमणे हटविली. यामध्ये तीन अतिक्रमणे पालिकेच्या वतीने जेसीबी व कामगारांच्या साहाय्याने हटविण्यात आली तर एकाने स्वतःहून आपले अतिक्रमण हटविले. नगर अभियंता विशाल होडावडेकर यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या कारवाईमुळे नोटिसा बजावण्यात आलेल्या इतरांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, बाजारपेठेतील काही व्यापार्‍यांनी अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याची तयारी दर्शविली असून ती हटविली न गेल्यास मंगळवार 20 मार्चपासून पुन्हा धडक कारवाई  करण्यात येणार असल्याचे होडावडेकर यांनी स्पष्ट केले.मालवण बाजारपेठ व शहरातील अंतर्गत रस्त्यांवर व्यापारी तसेच नागरिकांनी नव्याने इमारती बांधल्या आहेत.