Sun, May 19, 2019 22:13होमपेज › Konkan › नववर्ष स्वागतासाठी सिंधुदुर्गात देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी

नववर्ष स्वागतासाठी सिंधुदुर्गात देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:15PM

बुकमार्क करा
मालवण : वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या  मालवण तालुक्यासह वेंगुर्ले, निवती, देवगड या सागरी पर्यटन स्थळावर इयर एडिंग सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने देशी, विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत, तर नव वर्षाच्या स्वागतासाठी व पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्र्रशासनासह पर्यटन व्यावसायिकही सज्ज  झाले आहेत. मालवणात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दांडी येथील पर्यटन व्यावसायिकांनी बीच फेस्टिव्हल चे आयोजन केले आहे.

मालवण तालुक्यात ख्रिसमस- नाताळपासून देश विदेशातील पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. किल्ले सिंधुदुर्गसह स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग तसेच अन्य जलक्रीडांचा आनंद लुटण्यास पर्यटकांची गर्दी झाली आहे. पर्यटकांची विक्रमी गर्दी वाढत असल्याने बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या वाहनांनी फुलून गेला आहे.  दांडी येथे साकारण्यात आलेल्या  सी वॉटरपार्क चा आनंद लुटण्यासाठीही  पर्यटक मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील विविध धार्मिक पर्यटनस्थळेही गजबजून गेली आहेत. 

 चिवला बीच समुद्र किनारा हा सुरक्षित किनारा असून   याठिकाणी  पर्यटकांची  मोठी गर्दी  आहे.  याठिकाणी पर्यटक बनाना राईड, जेटस्की, पॅरासेलिंगचा आनंद लुटताना दिसून येत आहेत.