Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Konkan › संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:20PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

हिंदू धर्मातील वर्षातील पहिल्या मकर संक्रांतीच्या  सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. रविवार 14 जानेवारी रोजी सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मारुती मंदिर, गोखले नाका, धनजी नाका या भागात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी केली होती.

संक्रांतीसाठी छोट्या व्यावसायिकांनी गेल्या आठवड्यापासून तयारी चालवली आहे. संक्रांतीसाठी महिलांची पावले बाजाराकडे वळली. संक्रांत हा महिलांचा सण असल्याने बाजारपेठेत महिलांची गर्दी असल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. बाजारपेठेत संक्रांतीच्या वाणासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. यात मातीची सुगडे, हळदीकुंकू आणि वाणासाठी दिल्या जाणार्‍या संसारोपयोगी साहित्यांची दुकाने सजली आहेत. तसेच टहाळ, बोर, वाळूक, उस, जांब, बिब्याची फुले, गाजर, वाटाण्याच्या शेंगा या रानमेव्याचा वाणामध्ये वापर केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत या साहित्यांचीही विक्री केले जात आहे.

संक्रांत सणाला तीळ आणि गुळाचे महत्त्व आहे. तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. गतवर्षी तिळगुळाची किंमत 120 रुपये किलो होती. यंदाही ती तितकीच आहे. तसेच तिळाच्या लाडवांचा दर 200 रुपये प्रतिकिलो होता. यंदा तोही कायम आहे. तिळगुळ आणि तिळाच्या लाडवांच्या दरात वाढ न झाल्याने ग्राहकांमध्ये समाधानी आहेत.