शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या गळाला? 

Published On: Sep 18 2019 6:46PM | Last Updated: Sep 18 2019 6:56PM
Responsive image
माजी आमदार सुर्यकांत दळवी (संग्रहित छायाचित्र)


रत्नागिरी : पुढारी ऑनलाईन

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पक्षांतराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आयाराम गयारामांनी एका रात्रीत निष्ठांना तिलांजली सोयीचे घरोबा करून मोकळे झाले आहेत. 

याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. काँग्रेसलाही पक्षांतराने घरघर लागली आहे. हे एका बाजूने सुरू असतानाच आता शिवसेनेलाही गळती लागल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार सुर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दळवींनी आपल्या समर्थकांसह घेतली मुख्यमंत्र्यांची  रात्री उशिरा रत्नागिरीत घेतली भेट घेतली. 

या भेटीनंतर दळवी यांनी खुलासा केला. ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाली. माझ्यावरील अन्याय मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. शिवसेना पक्षप्रमुखांकडेही न्याय मागितला आहे. पक्षाने दखलच घेतली नाही तर मात्र मला निर्णय घेणं भाग पडेल. 

बाळासाहेब हयात नसल्यामुळे माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप दळवी यांनी केला.  निर्णय घ्यायची वेळ आली, तर भाजपमध्ये जाईन असे त्यांनी नमूद केले.  पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि सुर्यकांत दळवी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळेच दळवी नाराज असल्याची चर्चा आहे.