Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Konkan › सावित्री पुलावर स्विफ्ट कारची दूध टँकरला धडक ४ जखमी

सावित्री पुलावर स्विफ्ट कारची दूध टँकरला धडक ४ जखमी

Published On: Dec 11 2017 7:06PM | Last Updated: Dec 11 2017 7:05PM

बुकमार्क करा

महाड : प्रतिनिधी

आज दुपारी लांझाकडून मुंबईकडे निघालेली स्विफ्ट डिझायर क्रमांक mh46 w8843 या गाडीने चुकीच्या दिशेने येऊन मुंबईकडून गोव्याकडे निघालेल्या दूध टँकर क्रं.mh10aq9699 या गाडीला समोरुन धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर स्विफ्ट गाडीतील एका महिलेसह अन्य तिघांना  महाड गामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना मुंबईकडे रवाना केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. जखमींमध्ये दिनेश रामचंद्र गावकर (वय ३० )अभिषेक जनार्दन कोकाटे (२८) चालक नंदकुमार श्रीहरी नाखरे (६५) व सौ सुनिता नंदकुमार नाखरे (५८) यांचा समावेश आहे. या  अपघाताची नोंद ७५/१७ नुसार केली असून, पुढील तपास पोलीस नाईक  नागे हे करीत आहेत