Sat, Nov 17, 2018 01:48होमपेज › Konkan › महाड : चवदार तळ्यावर महामानवाला अभिवादन

महाड : चवदार तळ्यावर महामानवाला अभिवादन

Published On: Mar 20 2018 12:57PM | Last Updated: Mar 20 2018 1:33PMमहाड : प्रतिनिधी 

ऐतिहासिक महाड नगरीत चवदार तळ्याच्या ९१ व्या सत्याग्रह दिनाचे औचीत्य राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रविंद्र चव्हाण यांनी २० मार्च रोजी सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याला अभिवादन करून चवदारतळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवाला अभिवादन केले.

यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या समवेत महाडचे आ भरतशेठ गोगावले तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाड येथील क्रांतीस्तंभ येथील क्रांतीभूमीला अभिवादन करून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिवसभर होणाऱ्या कार्यक्रमाची चर्चा करून शासकीय अधिकाऱ्याशी बैठकी दरम्यान आढावा  घेतला.

Tags : mahad chavdar tale, remembrance programme, mahad