Sun, Nov 18, 2018 19:44होमपेज › Konkan › महाड बसस्‍थानकातून महिलेच्या पर्समधून १० हजार लंपास

महाड बसस्‍थानकातून महिलेच्या पर्समधून १० हजार लंपास

Published On: May 25 2018 12:13PM | Last Updated: May 25 2018 12:09PMमहाड: प्रतिनिधी

बसस्‍थानकावर होणार्‍या गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरांकडून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. महाड एसटी स्थानकात बुधवारी पुणे येथे जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून १० हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिस व प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने चोर सापडले नाहीत.

महाड एसटी स्थानकातून सकाळी १० वाजता सुटणारी महाड-पुणे ही बसने जात असताना मिश्रा या वयोवृध्द दाम्पत्यांच्या पर्समधून १० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, मात्र वेळीच पोलिस घटनास्‍थळी पोहचले नाहीत. त्यामुळे चोरट्यांचा तपास लागला नाही. बुधवारी वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांची साप्नाहिक सुट्टी असल्याने त्यांची केबीन बंद होती परंतु आगारप्रमुखांनी याच केबिनमध्ये असणाऱ्या सीसी टिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असते तर कदाचित या चोरीचा धागादोरा सापडला असता मात्र तसे न केल्याने हे प्रकरण त्याच ठिकाणी संपविण्यात आले.


राज्यातील सर्व स्थानकात सीसी टिव्ही कॅमेरे हे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून बसविण्यात आले आहे. स्थानकातील प्रत्येक हालचालावर या कॅमेऱ्याची नजर असणार आहे मात्र ज्या उद्देशाने हे कॅमेरे लावले आहेत तोच उद्देश जर सफल होणार नसेल व व्यवस्थापन त्याचा त्या पध्दतीने वापर करणार नसेल तर हा खर्च वायफल ठरेल असे प्रवासी वर्गाकडून बोलले जात आहे.