Sat, Apr 20, 2019 18:19होमपेज › Konkan › कोलझर येथे बिबट्याकडून वासराचा फडशा

कोलझर येथे बिबट्याकडून वासराचा फडशा

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 10:51PM

बुकमार्क करा

तळकट : वार्ताहर

कोलझर-कोळंबवाडी येथे भर लोकवस्तीत बिबटया घुसल्याने एकच खळबळ उडाली. बिबटयाने तेथीलच पद्मनाभ देसाई यांच्या घराजवळील गोठयात घुसून दोन महिन्याच्या वासराला ठार मारले. या घटनेमुळे कोलझर-कोळंबवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पद्मनाभ देसाई यांचे कोलझर-कोळंबवाडीत लोकवस्तीत घर असून घरालगत पाळीव जनावरांचा गोठा आहे. बुधवारी सायंकाळी 7.30 वा.च्या सुमारास बिबट्याने थेट गोठयात घुसून वासरावर हल्‍ला करत त्याला ठार मारले. यावेळी गोठयातील इतर जनावरे  मोठमोठयाने हंबरायला लागल्याने देसाई यांच्या घरातील लोकांनी गोठयाकडे धाव घेतली असता, गोठयात बिबट्या असल्याचे दिसून आले. माणसांची चाहूल लागताच बिबट्याने गोठयातून पळ काढला. 
या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून बिबट्या थेट लोकवस्तीत घुसत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.