Fri, May 29, 2020 10:10होमपेज › Konkan › लांजात अपना बाजार मॉलला आग; साडेअकरा लाखांची हानी

लांजात अपना बाजार मॉलला आग; साडेअकरा लाखांची हानी

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:36PM

बुकमार्क करा

लांजा : प्रतिनिधी 

येथील बसस्थानकासमोरच असलेल्या अपना बाजार मॉलला बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 11 लाख 50 हजार रुपयांचा माल खाक झाला.

भर  पहाटेच्या सुमारास आग लागल्यामुळे सुरुवातीला कुणालाच काहीही समजले नाही. काही वेळाने मॉलमध्ये  असलेल्या अग्निशामक सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर नजीकच्या एस. टी. स्टँड परिसरात असलेल्या रिक्षा आणि टपरीचालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मॉलशेजारी जाऊन पहिले तर आत भयानक आग लागल्याचे आढळून आले.

यानंतर या घटनेची माहिती तातडीने लांजा पोलिसांना देण्यात आली. याचवेळी काही धाडशी तरुणांनी मॉलचे तोडून आजुबाजूच्या घरांतून पाणी आणून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.