Wed, Aug 21, 2019 06:59होमपेज › Konkan › पावसामुळे भुईबावडा घाटात पडझड

पावसामुळे भुईबावडा घाटात पडझड

Published On: Jul 13 2019 1:40AM | Last Updated: Jul 12 2019 11:56PM
वैभववाडीःप्रतिनिधी
तालुक्यात गुरुवारी दिवसभर मूसळधार पाऊस झाला. या पावसाने भुईबावडा घाटात पडझड झाली आहे. 

दोन ठिकाणी दरडी गटारात कोसळल्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. दरम्यान अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे त्या मार्गावरील वाहातूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

घाट मार्ग परिसरात गुरुवारी जोरदार पाऊस झाला.त्यामुळे घाटमार्गात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. 

दरडी गटारात पडल्यामुळे गटाराचे पाणी दगड मातीसह रस्त्यावर येत आहे. रस्त्यावर चिखल येऊन रस्ता निसरडा झाला आहे. शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला आहे.