Sat, Apr 20, 2019 10:28होमपेज › Konkan › कुणकेश्‍वर समुद्रात खलाशी बेपत्ता

कुणकेश्‍वर समुद्रात खलाशी बेपत्ता

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 10:25PMदेवगड : प्रतिनिधी

देवगड बाजारपेठ विठ्ठलवाडी येथील विजय शिरसाट यांच्या ‘यक्षणीकृपा’ या नौकेवरील खलाशी बापू आप्पा कानसे (45, रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) हा कुणकेश्‍वर येथील समुद्रात मासेमारी करताना बुडाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी  घडली. शनिवारी उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही तो सापडू शकला नाही. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिरसाट यांची यक्षिणीकृपा नौका शुक्रवारी दुपारी मासेमारीसाठी गेली होती. यावेळी नौकेवर तांडेल रघुवीर सीताराम खवणेकर (देवगड किल्‍ला), खलाशी इकबाल मोहिद्दीन बोरकर (देवगड) व बापू कानसे हे होते. कुणकेश्‍वर मंदिरानजीक सुमारे 18 वाव पाण्यात मासेमारी करीत असताना उसळलेल्या मोठ्या लाटेमुळे नौका हेलकावे खात नौकेच्या नाळीवर बसलेला कानसे पाण्यात पडले. तांडेल खवणेकर व बोरकर यांनी तत्काळ त्याला पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पाण्यात दिसेनासा झाला. रात्री 8 वा. च्या सुमारास फोनवरून घटनेची माहिती मालक शिरसाट यांना खवणेकर यांनी दिली. अधिक तपास पोलिस नाईक प्रशांत जाधव करीत आहेत.