Fri, Apr 26, 2019 15:40होमपेज › Konkan › कुंभार्ली घाटात आठ तास वाहतूक ठप्‍प

कुंभार्ली घाटात आठ तास वाहतूक ठप्‍प

Published On: Feb 18 2018 9:20AM | Last Updated: Feb 18 2018 9:19AMगिमवी  : प्रतिनिधी

कुंभार्ली घाटामध्ये अवजड ट्रक बंद पडल्याने गेल्या आठ तासापासून कराड-चिपळूण मार्गावर वाहतूक ठप्‍प झाली आहे. कुंभार्ली घाटात पुणे, सातार्‍याकडे जाणारी वाहने आडकून पडली आहेत. वाहतूक ठप्‍प झाल्याने व  पोलिस प्रशासनाने याकड दुर्लक्ष केल्याने प्रवासीवर्गातून तीव्र संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे. 

कुंभार्ली घाटातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून नवाजा घाटातून सुरू करण्याची मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे.