Wed, Jan 23, 2019 04:24होमपेज › Konkan › ‘उठ दिव्यांगा जागा हो...समाजाचा धागा हो’!

‘उठ दिव्यांगा जागा हो...समाजाचा धागा हो’!

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:02PM

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

अंपगत्व ही एक शारीरिक  अवस्था असून  कोणताही रोग नाही.दिव्यांगाबाबत  समाजातील गैरसमज दूर  व्हावेत,शिक्षणातून  त्यांच्यात स्वावलंबन  व सरावातून  ही मुले  हुशार व्हावीत,या उद्देशाने ‘हक्‍क देवू संधी देवू,सर्वांचा  निर्धार अपंगांचा स्वीकार,उठ दिव्यांगा जागा हो समाजाचा धागा हो,सबसे प्यारा दिव्यांग हमारा’ अशा प्रकारचे अनेक संदेश देत झाराप येथे जागतिक अपंग दिन मोठ्या उत्साहात व अनेक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यातील अनेक कार्यक्रम दिव्यांग मुलांच्या जीवनाला  उभारी  देवून  त्यांना प्रोत्साहन देणारे ठरले.

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने जागतिक अपंग दिन जाहीर केला असून झाराप येथील ‘जीवदान’ या दिव्यांग मुलांच्या शाळेत सोमवारी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमांचा शुभारंभ झाराप सरपंच श्रीराम पेंडुरकर यांच्या हस्ते करण्यात आला.शाळेपासून झाराप तिठापर्यंत विशेष रॅलीही काढण्यात आली.यावेळी मुलांनी या फेरीमध्ये समाज जागृतीपर पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे क्रीडा, चित्रकला स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या शाळेत हा आठवडा अपंग सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असून मंगळवारी सावंतवाडी येथे मेडीकल मिशन सेक्युलर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमात जीवनदान शाळेच्या मुली दीपनृत्य सादर करणार आहेत.जीवदान शाळेच्या वतीने यावर्षी या कार्यक्रमामध्ये अधिक व्यापकता आणत मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात आला.शासनानेही दिव्यांगांच्या प्रगतीबाबत ठोस अशी पावले उचलावीत. गेली 18 वर्षे सुरू असलेल्या या शाळेला अद्याप शासनाकडून अनुदान मिळत असून शासनाने याचाही गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले. ग्रा.पं.सदस्या सौ.स्वाती तेंडोलकर,संस्था संचालक फादर सिबी जोसेफ, सहाय्यक फादर बीजो, मुख्याध्यापिका सिस्टर रोजा, समाजकार्य विभागाचे अध्यापक माया रहाटे, अमर निर्माळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

दिव्यांग मुलांच्या वस्तूंचे  प्रदर्शन 

जीवनदान शाळेमधील दिव्यांग मुलांमध्ये संस्थेने कौशल्य विकासावर आधारीत विविध वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुलांनी बनविलेल्या या वस्तूंचे प्रदर्शन झाराप तिठा येथे 9 रोजी स.10 वा. भरविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन केले आहे.