Mon, Jan 27, 2020 11:42होमपेज › Konkan › #INDvsPAK: भारताच्या विजयासाठी कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे!

#INDvsPAK: भारताच्या विजयासाठी कुडाळवासियांचे श्री गवळदेव चरणी साकडे!

Published On: Jun 16 2019 2:04PM | Last Updated: Jun 16 2019 2:05PM

कुडाळ : येथील श्री देव गवळदेव चरणी साकडे घालताना प्रा.अरूण मर्गज. सोबत उमेश गाळवणकर, डॉ.संजय निगुडकर व इतर.(छाया : काशिराम गायकवाड,कुडाळ)कुडाळ : प्रतिनिधी

 बाss देवा गवळदेवा...म्हाराजा... आज वटपोर्णिमेच्या निमित्तान भारत आणि पाकिस्तानाची मॅच इंग्लंडात सुरू आसा...आणि हि मॅच भारतान जिंकूची ह्येच्यासाठी तुझ्या चरणी ह्या भरलेला नारळाचा फळ ठेवला आसा..भारतान ही मॅच जिंकूची ह्येच्यासाठी सगळे शक्ती एकत्र कर..आमचे जे काय पोरगे ही मॅच खेळत त्यांच्या हातापायाक काय दुखापती झाले असतील तर त्येंका बरे कर..तरी हि मॅच भारतान पाकिस्तानाच्या नाक्कावर टिचान कोणत्याही परिस्थितीत जिंकांदेत..ह्या मॅचीकडे सगळ्या भारतासह महाराष्ट्र आणि कुडाळवाल्यांचे डोळे लागून रवले हत..या सगळ्यांच्या पदरात आनंदाचा यश दे म्हाराजा...तसेच यापुढचे सगळे मॅची भारतान जिंकूचे आणि वर्ल्डकप पण भारतात येवचो...म्हाराजा...होय म्हाराजा...असे मालवणी भाषेतील साकडे कुडाळवासियांनी रविवारी कुडाळ येथील श्री देव गवळदेव चरणी घातले. 

कुडाळ एमआयडीसी येथील बॅ.नाथ.पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरूण मर्गज यांनी हे मालवणी बोलीभाषेत साकडे घातले. यावेळी बॅ.नाथ पै. शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर, सिद्धेश गाळवणकर, व्यंकटेश भंडारी, परेश धावडे, नितीन बांबर्डेकर, किरण करंदीकर, बळीराम जांभळे, सुरेश वरक आदींसह कुडाळ मधील नागरिक उपस्थित होते.