Thu, Jun 20, 2019 14:55होमपेज › Konkan › तुम्ही आम जनतेचे खासदार आहात आता मंत्री व्हा!

तुम्ही आम जनतेचे खासदार आहात आता मंत्री व्हा!

Published On: Mar 15 2018 10:52PM | Last Updated: Mar 15 2018 9:38PMकुडाळ : प्रतिनिधी

सर्वसामान्य जनतेची  जाण असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे खा. विनायक राऊत. सर्वसामान्य जनतेच्या कामाबद्दल असलेली त्यांची तळमळ आणि संघटनात्मक कौशल्य हे खा. विनायक राऊत यांचे विशेष गुण आहेत. त्यामुळेच तमाम जनतेच्या मनात खा. राऊतांनी आपलेपणाची भावना निर्माण  केली आहे. या आपलेपणाच्या भावनेतूनच ते पुन्हा निवडून येतील आणि मंत्रीही होतील, असा विश्‍वास उपस्थित मान्यवर पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. मोठ्या उत्साहात ‘हॅप्पी बर्थ डे टु यू’ च्या स्वरात खा.  राऊतांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सिंधुदुर्ग  जिल्हा शिवसेनेच्या वतीने येथील महालक्ष्मी हॉल मध्ये या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर  शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख  आ. वैभव नाईक, महिला आघाडीप्रमुख सौ. जान्हवी सावंत, जि. प. सदस्य  संजय पडते, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, सभापती राजन जाधव, उपसभापती  सौ. श्रेया परब, सौ. स्नेहा  तेंडुलकर, सौ. अनुप्रिती खोचरे, प्रकाश परब, वर्षा कुडाळकर, जयंत रावराणे, संतोष शिरसाट, मंदार शिरसाट, श्री. खोबरेकर, राजू कविटकर, सचिन काळप, अ‍ॅड. हर्षद गावडे, बाबुराव धुरी, सचिन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

  खा. राऊत म्हणाले,  परभणी, हिंगोली, नांदेड आदी भागात आपण संघटनेचे काम केले. पण त्याठिकाणपेक्षा या माझ्या कोकणात  काम करण्यात मला मोठा आनंद मिळाला. कोकणातील देव-देवता जेवढे रक्षण करते तशाच प्रकारची साथ येथील  जनता आपल्याला देते याचा प्रत्यय मला आला. या कोकणभूमीला देवदेवताचा, बाळासाहेबांचा आर्शिवाद लाभला आहे, त्यामुळे येथील  जनतेच्या  अशिर्वादासाठी आम्ही भुकेलेलो आहोत. ज्यांनी या भूमिला लाथाडले  ते केव्हाच  दूर गेले. आज मी खासदार असलो तरी शिवसेना संघटनेचे काम करून मातोश्री आणि माझ्या मतदारसंघाची सेवा करणे हे माझं काम आहे. शिवसेनेत  निष्ठा, श्रध्दा आणि सेवेला  प्राधान्य आहे. कोकण ही देवभूमी आहे. या देवभूमीला आर्थिक विकासाकडे नेण्याच काम शिवसेना व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
  दुधवडकर म्हणाले, सिंधुदुर्गात राऊत साहेब खासदार झाल्यानंतर शिवसेनेत वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. आता येणार्‍या विधानसभेवर  भगवा फडकविण्यासाठी  भगवी गुढी उभारण्याच्या तयारीला लागा, त्याच खर्‍या शुभेच्छा खा. राऊत यांना असतील, असे सांगितले. आ. नाईक म्हणाले, आपल्याच कुटुंबातील एक वडिलधारी व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे. खा. राऊतांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिशा मिळाली. सर्व शिवसैनिकांनी खा. राऊतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे संघटनात्मक काम केले तर जिल्ह्यात सेना अधिक  फोफावेल असा आशावाद व्यक्त केला. संजय पडते, जान्हवी सावंत, जयंत रावराणे आदींनी त्यांचे अभीष्टचिंतन व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.