Wed, Mar 20, 2019 22:53होमपेज › Konkan › ‘माझे कोकण गाव’ गाण्याची सोशल मीडियावर धूम  

‘माझे कोकण गाव’ गाण्याची सोशल मीडियावर धूम  

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 9:46PMकुडाळ : शहर वार्ताहर

मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या गाजलेल्या मालवणी ‘लक्ष कोकण’ या कोकणवर आधारित बहुचर्चित ट्रॅव्हल शो चे मालवणी भाषेमध्ये शब्दबध्द  करून सजवण्यात आलेले ‘माझे कोकण गाव’ या शीर्षक गीताला  सोशल मीडिया व यूट्यूब चॅनेलवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन साईनाथ जळवी करत असून त्यांनी लिहिलेल्या गीत रचनेतून तयार झालेल्या या गीताला  मराठीतील आघाडीचा कलाकार नयन जाधव तसेच नवोदित अभिनेत्री नम्रता मुंदडा यांच्या अदाकारीने व पुष्कर श्रोत्री यांच्या पार्श्‍वगायनाने सजवण्यात आले आहे.

या शीर्षकगीतात संपूर्ण तळकोकणातील संस्कृती व येथील निसर्ग सौंदर्य, नद्या, माडा-पोफळीच्या बागा सुंदर व मनमोहक पध्दतीने  चित्रबध्द केलेले दिसून येतात. या गीतामध्ये नायिकेची भूमिका वटविणार्‍या पुणे येथील नम्रता मुंदडा या अभिनेत्रीने पहिल्यांदाच चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल टाकले आहे. 

या गीतातील नृत्य दिग्दर्शन आदेश वैद्य यांनी केले असून तन्मय पाटील यांनी छाया दिग्दर्शन केले आहे. ‘माझो कोकण गाव’ हे मालवणी गाणे सुप्रसिध्द  गायिका नेहा राजपाल व विवेक नाईक यांनी गायिलेले असून सिंधुदुर्गचे  सुपुत्र विजय गवंडे यांनी संगीत दिग्दर्शनाची तर प्रितम काळे यांनी साऊंड डिझायनर ही जबाबदारी  उत्तमरित्या पार पाडलेली आहे. कवी मडकईकर यांची गाण्याच्या सुरूवातीला असणार्‍या कवितेस अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी आवाज दिला आहे. 

गाण्याचे संकलन रेगे या मराठी चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळालेल्या दिनेश पुजारी यांनी केले असून ‘ह्यो माझो कोकण गाव’  हे गीत साईनाथ जळवी  यांनी लिहिले आहे.