Thu, Jan 17, 2019 10:41होमपेज › Konkan › वनसंज्ञा क्षेत्र लागवडीसाठी खुले 

वनसंज्ञा क्षेत्र लागवडीसाठी खुले 

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 9:19PMकुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 42 हजार हेक्टर क्षेत्रावर वनसंज्ञा आहे. ती काही आमची चूक नसून मागच्या सरकारची चूक आहे. पण, या वनसंज्ञेच्या जमिनीत काजू किंवा आंबा लागवडीसाठी आता शेतकर्‍यांना कुणीही रोखू शकत नाही. तसेच वनसंज्ञेतील खरेदी-विक्रीची बंधनेही शासनाने उठवली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

कुडाळ येथील हॉटेल ड्रीमलॅण्ड गार्डनमध्ये रविवारी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शताब्दी वर्ष महोत्सव कार्यक्रमात ना. मुनगंटीवार बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

ना. मुनगंटीवार म्हणाले, सिंधुदुर्गात स्थापन झालेली महाराष्ट्र काजू असोसिएशन ही एक चिरंजीव संस्था राहील. मला काजू झाडाची फारशी माहिती नाही.  पण काजूगराचा चाहता आहे. चांदा ते बांदा योजना पालकमंत्री दीपक केसरकर व मी केली. या योजनेत रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला आहे. 

मनरेगाच्या  फलोत्पादन स्कीममध्ये अनंत अडचणी आहेत. या अर्थसंकल्पात या अडचणी दूर केल्या जातील. मनरेगा योजनेत सरकार शेतकर्‍यांच्या शंभर टक्के पाठीशी राहील.  चालू वर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.