Mon, Sep 24, 2018 07:08होमपेज › Konkan › ‘युती अभंग राहावी!’

‘युती अभंग राहावी!’

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 10:38PMकुडाळ : प्रतिनिधी

‘पथका अंती लक्ष नही है सिंहासन पर चढते जाना’ आपल्याला पुुन्हा राज्यात सरकार आणायचे आहे ते भांब्रागडसारख्या भागात असणार्‍या गरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठीच, उद्या जर शिवसेना, भाजप स्वतंत्र लढली तर याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला होऊ शकतो, म्हणून 2019 मध्ये शिवसेनेने युती तोडू नये, अशी माझी अपेक्षा असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

काजू असोसिएशनच्या शताब्दी कार्यक्रमास उपस्थिती शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उद्देशून ना. मुनगंटीवार म्हणाले की, सुभाष बाबू या मंचावर आपण एकत्रित मंत्री म्हणून आलो आहोत. पुन्हा 2019 नंतर आपण एकाच व्यासपीठावर एकाच सरकारचे भाग म्हणून सिंधुदुर्गात येऊ, अशी अपेक्षा आहे. ना. मुनगंटीवारांच्या या वक्तव्याला धरून कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी ना. मुनगंटीवार यांना याबाबत विचारले असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेना, भाजप स्वतंत्र लढली तर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीला निश्‍चितच फायदा होईल, असे स्पष्ट करत युती कायम राहावी, असे मत व्यक्त केले. 

दरम्यान, युती तुटल्यास आपल्या सरकारला पुन्हा सत्तास्थानी येणे काहीसे कठीण होईल. याच हेतूने युती कायम राहण्याबाबत मुनगंटीवारांनी सूतोवाच केल्याचे बोलले 
जात आहे.