Thu, Jun 27, 2019 09:39



होमपेज › Konkan › कुडाळात आजपासून ‘सिंधु एज्युकेशन एक्स्पो’ 

कुडाळात आजपासून ‘सिंधु एज्युकेशन एक्स्पो’ 

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:02PM



कुडाळ : प्रतिनिधी

 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व शिक्षण विभाग आयोजित जिल्ह्यातील शिक्षक पालक व प्रेमींना विविध अभ्यासक्रमांची माहिती व्हावी, व्यवसाय,उद्योग, व स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन मिळावे याकरिता सिंधु एज्युकेशन एक्स्पो या कार्यक्रमाचे शनिवार 4  ते सोमवार 6 ऑगस्ट पर्यंत वासुदेवानंद ट्रेड सेंटर कुडाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. 

शनिवारी स.10 वा. शोभायात्रेने या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून दु.2 वा. माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत तर प्रमुख अतिथी पालकमंत्री दीपक केसरकर व खा. विनायक राऊत यांची उपस्थिती राहणार आहे. 

या कार्यक्रमाकरीता विधानपरिषद आ. निरंजन डावखरे, आ. बाळा राम पाटील, आ. अनिकेत तटकरे, आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि.प उपाध्यक्ष रणजीत देसाई, मुख्यकार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, अतिरीक्त सीईओे हरिष जगताप, सभापती सायली सावंत, शारदा कांबळे, राजन जाधव, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, गटनेते नागेंद्र परब, राजेंद्र म्हापसेकर, नगराध्यक्ष विनायक राणे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, अशोक खडुस व शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांनी केले आहे.