Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Konkan › जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते भात लागवड

जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते भात लागवड

Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:15PMकुडाळ : वार्ताहर

माणगाव खोरे श्री पद्धतीने भातपिकाची लागवड करून भातपिकात समृद्ध करण्यात येणार आहे. चालू वषार्त 60 एकरवर श्री पद्धतीने भाताची लागवड करण्यात  येणार असून पुढील वर्षात 500 एकर क्षेत्र या पध्दतीने भात शेतीच्या लागवडीखाली आणून भात पिकाच्या उत्पन्नात  दुप्पट वाढ करण्याचा दृढ निश्‍चय कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. यातील पहिल्या प्रात्यक्षिकाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते साळगांव येथे करण्यात आला आहे.

भातशेतीच्या परपरांगत लागवड पध्दतीला बाजूला ठेवत भात पिकात अमुलाग्र बदल व वाढ घडवून आणण्यासाठी भात पिकाची श्री पध्दत ही प्रभावी लागवड पध्दत ठरली आहे. याचा विचार करून माणगांव खोर्‍यातील बहुतांशी क्षेत्र या पध्दतीखाली आणण्याचा दृढ निश्‍चय कृषी विभागामार्फत करण्यात आला.माणगाव खोर्‍यत यावर्षी प्राथमिक टप्यात 60 एकर क्षेत्र श्री पध्दतीने लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.श्री पध्दतीने भात लागवडीतील एक भाग यंत्राद्वारे भात लागवड करण्याचा असल्याने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत यंत्र भात लागवडीचे प्रात्यक्षिक साळगाव येथे घेण्यात आले.जिल्हा कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, उपविभागीय  कृषी संचालक अजित अडसुळे, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, सरपंच उमेश धुरी, कृषी पर्यवेक्षक नीलेश उगवेकर, कृषि सहायक अँथोनी डिसोजा, पंकज बाविस्कर, मधुकर परब,सचिन मोरे आदी उपस्थित होते.याअंतर्गत दोन दिवसांपूर्वी जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्तेही शुभारंभ करण्यात आला होता.